सर्वनाम व त्याचे प्रकार | Sarvanam V Tyache Prakar [ Best ]

0

सर्वनाम व त्याचे प्रकार | Sarvanam V Tyache Prakar

सर्वनाम मराठी: (Pronoun) या नोट्स मध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील ( Grammar) सर्वनाम व सर्वनामाचे सर्व प्रकार व प्रत्येक सर्वनामाचे उदाहरण मराठी मध्ये . (Sarvanam in Marathi). सर्व प्रथम आपण बघणार आहोत सर्वनाम म्हणजे काय व त्याची व्याख्या काय आहे.

उदाहरणे. मी , तू , तो , हा , जो , कोण , काय , आपण , स्वतः इत्यादी

i) तो दररोज शाळेत जातो 
 ii) आपण एकत्र बसून जेवण करू

सर्वनाम व त्याचे प्रकार | Sarvanam V Tyache Prakar

सर्वनामचे एकूण सहा प्रकार पडतात : sarvanamche ekun sha prakar padtat

 • १) पुरुषवाचक
 • २) दर्शक
 • ३) संबंधी
 • ४) प्रश्नार्थक
 • ५) सामान्य
 • ६) आत्मवाचक

१) . पुरुषवाचक सर्वनाम purush vachak sarvanam

वाक्यामध्ये पुरूषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो, त्याला पुरूषवाचक सर्वनाम असे म्हणतात.

पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या purush vachak sarvanam vyakhya

पुरुषवाचक सर्वनामचे तीन उपप्रकार पडतात:- purush vachak sarvanamche tin upprakar padtat

अ) प्रथम पुरुषवाचक
ब) द्वितीय पुरुषवाचक
क) तृतीय पुरुषवाचक

Sangya and tyache prakar

अ) प्रथम पुरुषवाचक pratham purush vachak

प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीनी स्वतःबद्दल वापरलेले सर्वनाम होय.

उदाहरणे. मी , आम्ही , आपण , स्वतः इत्यादी

i)आज मी शाळेत जाणार
ii) आपण मंदिरात दर्शनाला जाऊ

  ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम driwitya purushvachak sarvanam

द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे एखादी बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते , त्यांच्याशी वापरलेले सर्वनाम होय.

उदाहरणे. तू , तुम्ही , आपण , स्वतः इत्यादी

i) तू नेहमी शाळेत उशिरा येतोस
ii) तुम्ही उद्या सकाळी झेंडावंदनला हजर रहा.

क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम trutiya purush vachak sarvanam

तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे एखादी बोलणारी व्यक्ती ज्यांच्याविषयी बोलते त्यांच्याविषयी वापरलेले सर्वनाम होय.

उदाहरणे. तो , ती , ते , त्या  इत्यादी

i) तो दररोज सकाळी लवकर उठतो 
ii) त्या बाई नेहमी मुलाशी भांडत असतात

2. दर्शक सर्वनाम : darshak sarvanam

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.

उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.

 •  ही माझी वही आहे
 • हा माझा भाऊ आहे.
 • ते माझे घर आहे.
 • तो आमचा बंगला आहे.

3. संबंधी सर्वनाम : sambandhi sarvanam

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.

उदा – जो, जी, जे, ज्या

– ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
– ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
– असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
 • जे चकाकते ते सारेच सोने नसते.
 • जो तळे राखील तो पाणी चाखील.

4. प्रश्नार्थक सर्वनाम : prashnarth sarvanam

ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

  उदा – कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

 • तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?
 • तुझ्याकडे किती रुपये आहेत?
 • तू कोठे जातोस?

5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम : samanya/ anishchit sarvanam

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

उदा.

 • त्या पेटीत काय आहे ते सांग.
 • कोणी कोणास हसू नये.
 • कोण ही गर्दी !

6. आत्मवाचक सर्वनाम : aatma vachak sarvanam

एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

  उदा.

 • 1. मी स्वतःत्याला पहीले.
 • 2. तू स्वतः मोटर चालवशील का?
 • 3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
 • 4. तुम्ही स्वतःला काय समजतात.

Read More Keywords

 • सर्वनाम शब्द के उदाहरण मराठी
 • सर्वनामाचे 10 वाक्य
 • आत्मवाचक सर्वनाम
 • पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार
 • दर्शक सर्वनाम
 • द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
 • सर्वनाम in English
 • नाम सर्वनाम विशेषण क्रियापद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here