क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय
आता पुढील वाक्ये पाहा.
- मुलगी जलद चालते.
- मुलगा जलद चालतो.
- मुली जलद चालतात.
- मुले जलद चालतात.
वरील वाक्यांतील ‘ जलद ‘ हे क्रियाविशेषण ‘ चालणे ‘ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. तसेच, लिंग, वचन यांमध्ये बदल केला तरी ‘ जलद ‘ या क्रियाविशेषणावर काही परिणाम होत नाही. त्यात बदल होत नाही. ते तसेच राहते. म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरता वाक्यातील त्याच्या कार्यावरून ठरतो. हे आपण पाहिले आहे. तीच गोष्ट क्रियाविशेषणाच्या बाबतीतही खरी आहे. उदा . ‘ मोठा ‘ हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. तो मुळात विकारी किंवा सव्यय आहे ; कारण लिंगवचनांतील बदलाप्रमाणे त्याची रूपे ‘ मोठा – मोठी मोठे ‘ अशी होतात.
पण त्याला ‘ मोठ्याने ‘ असे तृतीयेचा ‘ ने ‘ हा प्रत्यय लागून रूप तयार होते. तो लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. म्हणून तो शब्द अविकारी किंवा अव्यय, तर ‘ मोठा ‘ हा शब्द विकारी किंवा सव्यय आहे. तसेच म्हण (क्रि.) सव्यय, तर ‘ म्हणून ‘ अव्यय. ‘ जोर ‘ (नाम) सव्यय तर ‘ जोरात ‘ अव्यय. शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागून ते अव्यय झाले की, मग त्याला पुन्हा विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत.
क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.
क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात.
1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय :
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात.
उदा. आधी, आता, सद्य, तूर्त, हल्ली, काल, उधा, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादि.
- मी काल शाळेत गेलो होतो
- मी उदया गावाला जाईन.
- तुम्हा केव्हा आलात?
- अपघात रात्री झाला.
उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अधाप,
- पाऊस सतत कोसळत होता.
- सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.
- पोलिसांना अधाप चोर सापडला नाही.
उदा. फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इये.
- आई दररोज मंदिरात जाते.
- सीता वारंवार आजारी पडते.
- फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.
- संजय क्षणोक्षणी चुकत होता.
2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय :
स्थळवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकार पडतात.
उदा. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, सभोवताल इत्यादि.
- मी येथे उभा होतो.
- जिकडे-तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे.
- तो खाली बसला.
- मी अलीकडेच थांबलो.
उदा. इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालुन, लांबून, दुरून.
- जंगलातून जातांना पुढून वाघ आला
- चेंडू दूर गेला.
- घरी जातांना इकडून ये.
3. रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय –
याचे 3 प्रकार पडतात.
उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.
- राहुल सावकाश चालतो.
- तो जलद धावला.
- सौरभ हळू बोलतो
उदा. झटकण, पटकण, पटापट, टपटप, चमचम, बदाबद, इत्यादी.
- त्याने झटकण काम आटोपले.
- दिपा पटापट फुले वेचते.
- त्याने जेवण पटकण आटोपले.
उदा. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.
- राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार
- तू खुशाल घरी जा.
- तुम्ही खरोखर जाणार आहात?
4. संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय –
उदा. कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी.
- मी क्वचित सिनेमाला जातो.
- तुम्ही जरा शांत बसा.
- राम अतिशय प्रामाणिक आहे.
- तो मुळीच हुशार नाही.
5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय –
उदा.
- तू गावाला जातो का?
- तू आंबा खाणार का?
- तुम्ही सिनेमाला याल ना?
- तुम्ही अभ्यास कराल ना?
6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय –
उदा.
- मी न विसरता जाईन.
- तो न चुकता आला.
- त्याने खरे सांगितले तर ना !
- मी न चुकता तुला भेटेल.
स्वरूपावरून पडणारे प्रकार :
1. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय –
उदा. मागे, पुढे, येथे, तेथे, आज इत्यादी.
- तो मागे गेला.
- तू पुढे पळ.
- ती तेथे जाणार.
- आम्ही येथे थांबतो.
2. साधीत क्रियाविशेषण अव्यय –
यांची 2 गटात विभागणी होते.
- नामसाधीत: रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिश, वस्तूत:
- सर्वनामसाधीत: त्यामुळे, यावरून, कित्येकदा,
- विशेषणसाधीत: मोठयाने, एकदा, इतक्यात, एकत्र.
- धातुसाधीत: हसू, हसत, हसतांना, पळतांना, खेळतांना
- अव्ययसाधीत: कोठून, इकडून, खालून, वरून.
- प्रत्यय सधीत: शास्त्रदृष्ट्या, मन:पूर्वक, कालानुसार.
उदा.
- तो रात्री आला.
- मी त्यांना व्यक्तिश: भेटलो.
- तिने सर्व रडून सांगितले.
- त्याने हे काम मन:पूर्वक केले.
- तु हसतांना छान दिसतेस.
- धबधबा वरून कोसळत होता.
- आम्ही एकत्र अभ्यास करतो.
- तो कित्येकदा खोटे बोलतो.